घरकुल योजनेच्या अनुदानात झाली मोठी वाढ! यादीत नाव चेक करा

सरकारने प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेअंतर्गत घर बांधण्यासाठी मदत दिली जाते. सध्या या योजनेत लाभार्थ्यांना 1 लाख 20 हजार रुपये मिळतात. मात्र, सात वर्षांपासून या रकमेत वाढ झाली नव्हती, त्यामुळे अनेक लोक नाराज होते. ही अडचण लक्षात घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनुदानात 50 हजार रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे घर बांधण्यास अधिक मदत मिळेल.

राज्यात 20 लाख नवीन घरकुले

प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत महाराष्ट्राला 20 लाख नवीन घरांचे उद्दिष्ट मिळाले आहे. मागील 45 दिवसांत 100% घरांना मंजुरी मिळाली आहे. यापैकी 10 लाख 34 हजार लाभार्थ्यांना पहिला हप्ता मिळाला आहे. उर्वरित 10 लाख लाभार्थ्यांना देखील लवकरच पहिला हप्ता दिला जाणार आहे. सरकारचे उद्दिष्ट पुढील वर्षभरात सर्व 20 लाख घरकुलांचे काम पूर्ण करण्याचे आहे.

अनुदान वाढीमुळे मोठा फायदा

बर्‍याच लोकांना घर बांधण्यासाठी मिळणारे पैसे कमी पडत होते, त्यामुळे घरकुल पूर्ण होण्यास अडचण येत होती. हे लक्षात घेऊन सरकारने अनुदान वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. पुढील अर्थसंकल्पात यासाठी विशेष तरतूद केली जाईल.

काही विशेष बाबी

  • ज्या लाभार्थ्यांकडे स्वतःची जागा नाही, त्यांना 50 हजार रुपयांऐवजी 1 लाख रुपयांचे अनुदान मिळेल.
  • शबरी आवास योजनेअंतर्गत 2.5 लाखांपर्यंत अनुदान दिले जाते.
  • प्रधानमंत्री घरकुल योजनेचे अनुदान वाढवून 2.10 लाख रुपये करण्याचा सरकारचा विचार आहे.

घरकुल योजना गरिबांसाठी खूप महत्त्वाची आहे. सरकारच्या या निर्णयामुळे अनेक कुटुंबांना हक्काचे घर मिळेल. जर तुम्ही या योजनेसाठी पात्र असाल, तर लवकरात लवकर अर्ज करा आणि या संधीचा लाभ घ्या!

Leave a Comment